कन्हान :- बोरडा (गणेशी) येथे सर्व गावकरी नागरि कांच्या सहकार्याने तान्हा पोळा पारंपारिक पध्दतीने तसेच जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे छोटया लहान मुलांचा तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला.
शुक्रवार (दि.११) सप्टेंबर २०२६ ला बोरडा (गणेशी) येथे आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव व प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य वेंकटेश कारेमोरे यांचे हस्ते पुजन करून तान्हा पोळा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी किशोर बेलसरे, थानेदार वैजयंती मंडवाधरे, बोरडा ग्रा. प सरपंचा रेखा बेनी प्रसाद डडुरे, उपसरपंच नरेंद्र ठाकरे, युथ फॉऊंडेशनचे कँप्टन सतिश बेलसरे आदीं प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी तान्हा पोळयाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्र माचे अध्यक्ष प्रकाश जाधव हयानी उपस्थित गावक-यांना शेतक-यांच्या बिकट परिस्थितीवर मात करण्या विषयी मौलाचे मार्गदर्शन केले. तदंतर तान्हया पोळयात उपस्थित छोटया छोटया लहान मुलांना भेट वस्तु व प्रसाद वितरण करून तोरण तोडुन पोळा फोडु न तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या यशस्वितेकरिता मंडळाचे अध्यक्ष राजु डडुरे, राजु राऊत, दिनेश बंड, मुकेश सोनवणे,पो, पाटील योगेश नांदुरकर, शेषराव कुहिटे, मधुकर बंड, रामराव बंड सह गावातील सर्व गावकरी मंडळीने सहकार्य केले.
जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान
दरवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवार (दि.११) सप्टेंबर ला सायंकाळी ५ वाजता जय शीतला माता मंदिर समि ती मेन रोड कांद्री- कन्हान व भाविक मंडळी व्दारे शीतला माता मंदिरात प्रकाश ढोके व वसंता राऊत यांचे हस्ते पुजा पाठ करून मंदिर समोरील भागात उभे असलेले नंदी व मुलां, मुलींची पुजा केली आणि संपुर्ण मुलांना रोख बक्षीस मा. संजय चौकसे लायन्स क्लब कामठी सेन्ट्रल व शीतला माता मंदिर च्या सौजन्याने तसेच नगरपंचायत कांद्री नगरसेविका आरती रविंद्र कोतपल्लीवार यांचे कडुन भेट वस्तु व राणी आशिष सोनी (सैनिक कॅन्टीन) यांचे कडुन बिस्कीट पुडे आणि महेश मंगतानी यांचे कडुन चिप्स पाकीट वाटप करण्या त आले. सोबत प्रसाद वाटप करुन ” हर हर महादेव, हर हर महादेव” गर्जना करुन पोळ्याचे तोरणं तोंडुन तान्हा पोळा फोडुन मुलं घराकडे निघाला लागले. या प्रसंगी प्रामुख्याने अशोक खैरकर, पारस मरघडे, चंद्र शेखर बावनकुळे, रामचंद्र राऊत, विनोद, ओमदास लाडे, अरुण बावनकुळे, गजानन वडे, सुधाकर हट वार (गुरुजी), बादल विश्वकर्मा, प्रमोद मानकर आणि महिला बघीनी सह समस्त भाविक मंडळीच्या उपस्थितीत तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला.





