किशोर साहू, मौदा :- चाचेर- निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या येसंबा (सालवा) येथे ग्रामपंचायत कार्यालय येसंबा प्रांगणात तान्हा पोळ्याचे आयोजन उपसरपंच धनराज हारोडे तसेच गावातील लोकांच्या सहभागातून करण्यात आले.
बालगोपाल यांना भेटवस्तू आणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे, पोलीस पाटील नरेंद्र राऊत,कार्तीक भोयर, सिध्दार्थ गजभिये, नागोराव पानतावणे, कुमार गडे, रविशंकर हारोडे, सुंदरलाल महाल्ले, फुलचंद इरपाते, महेन्द्र कारोंडे,अतुल कारोंडे सह गावातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





