किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाचेर गावात ठिकठिकाणी तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वार्ड क्रमांक १ मधील हनुमान मंदिर परिसरात हा उत्सव अतिशय आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
या प्रसंगी लहान बालकांनी आपले सजवलेले लाकडी नंदी बैल घेऊन उत्सवात सहभाग घेतला. सर्व लहान बालकांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या, त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलले व त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत चाचेर सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यगण योगेश निनावे, माजी उपसरपंच प्रकाश वाकलपुडी, नरेंद्र निनावे, मंगेश लेदे, गज्जू कैकाडे, कृष्णा साखरवाडे, रामा बागडे,प्रमोद कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन सहारे, राधेश्याम दरवई, रमेश निनावे, अशोक बावनकुळे, डॉ.दिनेश बादोले, विलास दरवई, राकेश राऊत, महेश वंजारी, नीलकंठ बावनकुळे,महेश महादुले, नरेंद्र लोहकरे,महेश सोनवणे,प्रकाश निनावे,पुरुषोत्तम गडे,राजू महादुले, शिशुपाल कुटे, प्रवीण निनावे,दिलीप ढोमणे, आकाश राऊत,नंदू बुधे, रवी खंडाईत,आकाश बावणे यांच्यासह लहान बालके, महिला भगिनी व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील परंपरा आणि संस्कृती जपत हा तान्हा पोळा उत्सव यशस्वीपणे पार पडला.





