किशोर साहू,मौदा :- गुरुवार (ता. 10 सप्टेंबर)ला निमखेडा येथील विश्रांती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये बैल-पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बैलांच्या पूजेचे महत्त्व सांगितले. त्यांनी शेतकरी आणि बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी बैलांचा पोशाख परिधान केला होता.
प्राचार्य शांता खांडेकर, बिंदू तागिरिसा आणि रक्षक खांडेकर यांनी पोळा उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले.





