spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रसायने आणि खते मंत्री, जेपी नड्डा यांच्या दालना बाहेर आंदोलन

 
युरिया तुटवड्या विरोधात खासदार बर्वे यांच्या नेतृत्वात कार्यालय बाहेर खासदारांचा ठिय्या. 
 
कन्हान ९ : – नागपुर जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांना युरि याची तीव्र टंचाई भासत असल्याने नागपुर जिल्ह्याती ल कन्हान स्थित रॅक पॉइंटला साधारणतः ५००० मेट्रि क टन युरियाचा तात्काळ पुरवठा सुनिश्चित करण्या संदर्भात खते विभाग (डीओएफ) आणि संबंधित युरि या उत्पादक/आयातदारांना तात्काळ निर्देश देण्याचे निवेदन (दि.२८) जुलै रोजी रसायने आणि खते मंत्री, जे.पी.नड्डा यांना देण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे ही मानसिकता सरकार व त्यांच्या मंत्र्यांची दिसुन येत नसल्याने महाराष्ट्रातील इतर खासदारांसह अधिवशेन दरम्यान रसायने आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांच्या दालनापुढे ठिय्या आंदोल न पुकारण्यात आले.
नागपूर जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तुटवडा मोठ्या प्रमानात जाणवत आहे. अनेक शेतकरी खत खरेदीसाठी कृषी केंद्रांमध्ये फेऱ्या मारत आहेत. पण त्यांना पुरेसा युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी खास दार श्यामकुमार बर्वे यांना शेतकऱ्यांच्या वतीने प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना युरिया खतांचा पुरवठा होत नस ल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लाग त आहे. अश्यात  जगत प्रकाश नड्डाजी, रसायने आणि खते मंत्री भारत सरकार, नवी दिल्ली यांना निवे दन देऊन समस्यांचे निराकरण करून नागपुर जिह्या तील कन्हान स्थित रॅक पॉइंटला साधारणतः ५००० मेट्रिक टन युरियाचा तात्काळ पुरवठा सुनिश्चित कर ण्या संदर्भात खते विभाग (डीओएफ) आणि संबंधित युरिया उत्पादक/आयातदारांना तात्काळ निर्देश देण्या ची मागणी केली होती. मात्र निवेदनाची कुठलीही दख ल न घेता शेतकऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा करायला देखील मंत्री वेळ देत नसल्याने अखेर सभागृहातील मंत्री याच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन करून सरकार चे शेतकऱ्यांच्या युरिया खतांच्या तुटवड्याच्या समस्ये कडे लक्ष केंद्रित केले. आंदोलनामुळे अखेर मंत्रालया ला जाग येऊन खासदारांच्या शिष्टमंडळाची तातडीने भेट घेण्यात आली आणि निवेदन स्विकारण्यात आले.

Popular Articles