spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरात 11 ठिकाणी ईव्ही चार्जिग स्टेशनच्या कामाची सुरुवात

मनपा अतिरिक्त आयुक्त वैष्णवी.बी यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर, ता. ९ :  नागपूर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून 11 विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. शुक्रवारी(ता.९) मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी. बी. यांच्या हस्ते रहाटे चौक येथे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता  राजेद्र राठोड,  सहायक अभियंता  प्रमोद भस्मे, रिलायन्स बी.पी. इन्फ्रा लिमिटेडचे  सचिन बोरेकर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्दशनानुसार शहरात ईव्ही वाहनसाठी चार्जिग स्टेशनच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे.  ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाकरिता रिलायन्स बी.पी. इन्फ्रा लिमिटेड, मुंबई यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

सुलभ चार्जिंग स्टेशन उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोणातून जयताळा बाजार चौक (ऑरेंज स्ट्रीट), राहाटे कॉलनी चौक (पीकेव्हीच्या जागेजवळ), दयानंद पार्क, पोलीस मोटर ट्रॉन्सपोर्ट सेक्शन काटोल रोड, पत्रकार भवन जवळील पार्किंगच्या जागे मध्ये यशवंत स्टेडियमच्या जवळ, वाडी नाका अमरावती रोड, फुटाळा रोड पोलीस चौकी जवळ, बुधवारी बाजार सक्करदरा पाण्याच्या टाकीजवळ, शांतीनगर मेन रोड पाण्याच्या टाकीजवळ, अंजूमन कॉलेजच्या मागे मंगळवारी कॉम्प्लेक्स, सेंट्रल बाजार रोड वर तुली एम्पीरियर हॉटेलच्या पार्किंगच्या विरुध्द बाजूला अशा एकून  एकून 11 ठिकाणी हे चार्जिग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे शहरातील 2 व्हिलर, 3 व्हिलर, व 4 व्हिलर ईव्ही गाडी चालविणाऱ्या नागरीकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

Popular Articles