spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोहागांव सावंगी येथे उत्साहात पोळा साजरा

कळमेश्वर :- तालुक्यातील मोहागाव सावंगी येथे पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून पारंपरिक रीतीरिवाजानुसार पोळा उत्सवात सहभाग घेतला. यावेळी गावातून बाजे- गाजे व ढोल- ताशांच्या गजरात १७ बैलजोड्या सजवून कार्यक्रमस्थळी आणण्यात आल्या. रंगीबेरंगी सजावटीने नटलेल्या बैलजोड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांनी बैलांची पूजा-अर्चा करून शेतीच्या कामात मोलाचे योगदान देणाऱ्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सरपंच आशुतोष ताभने यांच्या हस्ते गावातील सर्व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना टोपी व दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे कार्यक्रमातील उत्साह अधिक वाढला. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक पोळा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोळा सणाच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी आशुतोष ताभने, विजय ठाकरे, चक्रधर भोयर, लेखिनराव भोयर, उमराव नाखले यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले. विशेषतः गावातील लहान मुलांमध्ये पोळा सणाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुलांनीही सजवलेल्या बैलांसोबत कार्यक्रमात सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला. पोळा हा केवळ धार्मिक व पारंपरिक सण नसून शेतकरी आणि त्यांचे पशुधन यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण सण आहे. शेतीच्या कामात बैलांचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आजही ग्रामीण भागात जपली जात आहे.

याच परंपरेचे करत मोहागाव सावंगी येथे पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.