spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नंदापूरात रंगला कुस्त्यांचा थरार! तान्हा पोळ्यानिमित्त भरत नंदीग्राम व्यायामशाळेतर्फे आमंदंगलीचे आयोजन

खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे तान्हा पोळ्याच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही भरत नंदीग्राम व्यायामशाळा व ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक आमंदंगलीचे आयोजन करण्यात आले. परिसरातील पैलवानांच्या दमदार कुस्त्यांमुळे आखाड्यात चांगलाच थरार रंगला.

माजी सरपंच मनोज बनसोड यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करून कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अशोक मुरकुटे, आनंदराव चौधरी, तुळशिदास पाटील, पत्रकार पुरुषोत्तम नागपुरकर, दिवाकर ढोके व बाबाराव मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमंदंगलीत परिसरातील विविध गावांमधील पैलवानांनी सहभाग घेत आपल्या कुस्ती कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. चुरशीच्या लढतींनी उपस्थितांची दाद मिळविली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पैलवानांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

विदर्भ चॅम्पियन लोकेश कोमटे व अनिल मोजनकर यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला विशाल कोमटे, सौरभ ढोके, अनिल येलेकर, उज्ज्वल कोमटे, छत्रपाल कोमटे, धोंडबा मोजनकर, उज्ज्वल कडू, शैलेश मुरकुटे, मयूर चटप, रोशन येलेकर, प्रफुल मुरकुटे, शुभम नागपुरकर, किशोर धोटे, उमेश कोडवते, धीरज धंदरे व सौरभ मुरकुटे यांच्यासह गावातील व परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंपरा आणि कुस्ती संस्कृतीचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या आमंदंगलीला ग्रामस्थ व कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.