spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निसतखेड्यात वाजतगाजत मारबतीची मिरवणूक, सुरुवातीपासून तर विसर्जनापर्यंत सर्दी, खोकला, रोगराई घेऊन जा गे मारबत……. चा गजर

किशोर साहू, मौदा :- ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या मारबत महोत्सवाला निसतखेडा गावात मागील तीन वर्षापासून खंडित असणारी मारबत यावर्षी पुन्हा काढण्यात आली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बगड्या उत्सव थाटात साजरा केला जातो. या दिवशी समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी निसतखेडा गावात मारबत मिरवणूक काढली आणि सर्दी, खोकला, रोगराई घेऊन जा गे मारबत…. च्या गजरात निसतखेडा गावातील नदीवर विसर्जन केले.

याप्रसंगी निसतखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच प्रज्ञा राहुल बावणे, पोलिस पाटील प्रकाश महादुले, प्रहारचे नेते राहुल बावणे, आशिष चव्हाण, दिलीप चव्हाण, अंकित महादुले, रंजित घिवतोंडे, महेश महादुले, राधेश्याम डडूरे, रोशन डडूरे, विठ्ठल मसराम, रवींद्र चव्हाण, राजू सहारे, अजित लक्षणे, विशाल डडूरे, सुरज भिलकर, हेमराज डडूरे, मधुकर भिलकर, सोहन नारनवरे, ईश्वर महादुले, अशोक डडूरे, बंडूजी लोंढेकर, रामभाऊ भिलकर, अमोल डडूरे, मंगेश कोसरे, अशोक महादूले, धिरज डडूरे, रोहन डडूरे, देवेंद्र डडूरे, भोजराज बागडे, योगेश भिलकर, विक्रम डडूरे, नंदकिशोर डडूरे आदित्य दारोडे विलास महादुले व इतर सर्व गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.