नागपूर :- विदर्भातील प्रसिद्ध आणि लहान मुलांच्या आवडीचा सण असलेल्या ‘तान्हा पोळा’ साईबाबा नगर खरबी परिसर उत्सवामध्ये यंदा परंपरेसोबतच एका सामाजिक संदेशाची सुंदर सांगड पाहायला मिळाली. डॉक्टरच्या वेशभूषेत आलेल्या एका चिमुकलीने ‘गुड टच आणि बॅड टच’ (सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श) या अत्यंत संवेदनशील विषयावर जनजागृती करत उपस्थितांची मने जिंकली. तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुले आपले लाकडी नंदीबैल सजवून उत्साहाने सहभागी होतात. या उत्सवात पांढरा कोट, गळ्यात स्टेथॉस्कोप घालून ‘फ्युचर डॉक्टर’ बनलेल्या या बालिकेने हातामध्ये जनजागृतीचे फलक (प्लेकार्ड्स) धरले होते. सणाच्या आनंदात केवळ खेळ- मज्जा न करता, बाल शोषणाविरोधात आणि स्वतःच्या सुरक्षितते विषयी लहान मुलांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या चिमुकलीने केला.
तान्हा पोळ्यात चिमुकल्या ‘फ्युचर डॉक्टर’चा स्तुत्य उपक्रम; ‘गुड टच, बॅड टच’बाबत केली जनजागृती!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




