खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे पारंपरिक तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपालांनी आकर्षक रंगरंगोटी व सजावट केलेले नंदीबैल पोळ्यात आणल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोड यांच्या पुढाकाराने बनसोड परिवारातर्फे उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोड्या व नंदीबैलांना बक्षिसे देण्यात आली. बैलजोडी सजावट स्पर्धेत प्रविण मारबते यांनी प्रथम, जितु ठाकरे यांनी द्वितीय, तर उज्वल कोमटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
नंदीबैल सजावट स्पर्धेत सचित आशिष धोटे प्रथम, रिध्विका रोशन येलेकर द्वितीय, तर सारवी मुरकुटे तृतीय ठरले. विजेत्यांना गावातील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोड, माजी सरपंच मनोज बनसोड, पत्रकार पुरुषोत्तम नागपुरकर, दिवाकर ढोके, आनंदद्राव चौधरी, गंगाधर पाटील, मयूर चटप, रोशन येलेकर, प्रफुल्ल मुरकुटे, अशोक मुरकुटे, अनिल येलेकर, श्रीरंग चटप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





