किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडाळा (गांगनेर )मध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन हनुमान मंदिर जवळ करण्यात आले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, लहान बालगोपाल , सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व प्रसाद देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजन ओम नाथ, रोशन वाघमारे, वामन गडे ,अमोल वाघमारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच संकेत झाडे, उपसरपंच राष्ट्रपाल गजभिये, पोलीस पाटील सविता गजभिये ,मुकेश अमृते,पंकज अमृते,लखन वाघमारे, प्रतिष्ठित नागरिक दत्ताजी वाघमारे, माधवराव श्रीरामे, नेहालसिंग तेहरिया व गावातील संपूर्ण लोक उपस्थित होते.





