spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भानेगाव कोळसा खाण परिसरात बिबट्याचे दर्शन

– परिसरात भीतीचे वातावरण; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी

भानेगाव :- भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाण परिसरातील कन्व्हेयर कोल पाइप-वे बंकर भागात रविवारी दुपारी बिबट्या दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महानिर्मितीच्या कन्व्हेयर कोल पाइप-वे प्रकल्पाच्या माध्यमातून भानेगाव, शिंगोरी, गोंडेगाव आदी कोळसा खाणींमधून कोळसा आणला जातो. कन्व्हेयर कोल पाइप-वे बंकरच्या माध्यमातून हा कोळसा खापरखेडा व कोराडी औष्णिक वीज केंद्रात पोहोचविला जातो.

रविवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास बंकर परिसरातील रस्ता ओलांडताना कामगार व नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्याची सतत वर्दळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी बिनासंगम, शिंगोरी आणि भानेगाव परिसरात बिबट्याने अर्धा डझनहून अधिक गायींची शिकार केल्याचे समोर आले आहे. वारंवार बिबट्याचा वावर आढळून येत असतानाही वन विभागाला त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.

परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता पारशिवनी, कामठी आणि खापा वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.