spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अखिल खेडुला समाज नागपूरच्या नवीन कार्यकारिणीची आमसभेत एकमताने निवड

– अखिल खेडुला समाज नागपूरच्या नवीन कार्यकारिणी जाहीर

नागपूर :- अखिल खेडुला समाज, नागपूरच्या कार्यकारिणीची आमसभा रविवारी १३ सप्टेंबर 2029 रोजी, समाजभवनात उत्साहपूर्ण व एकोप्याच्या वातावरणात पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणीचे गठण सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी करण्यात आले. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी देवा ढोरे आणि सचिवपदी नंदकिशोर अलोने यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अरुण राऊत व अरुण ठेंगरे, सहसचिवपदी दयाराम सहारे व वसंतराव दोनाडकर, तर कोषाध्यक्षपदी भीमराव कांमडी यांची निवड करण्यात आली. इतर संचालक मंडळ मोरेश्वर दोनाडकर, मनोहर कुथे, चंद्रकांत राऊत, दिनेश तुपटे, प्रमोद खरकाटे, रौनक शिकारी, संकेत राऊत, अमोल पिलारे, धनराज शिलारे, पुरुषोत्तम भोयर, अजय ठाकूर, सुनील दोनाडकर, जितेंद्र सौंदरकर व कैलाश बगमारे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. आमसभेत नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले. समाजाची एकजूट अधिक बळकट करण्या सोबतच सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजहितासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.