spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बजरंगनगरात महिलांनीच उभारला मंगळागौरीचा दणदणीत जल्लोष ! 

– नववारीतील ठसकेबाज नृत्य, उखाण्यांनी रंगली रात्र

नागपूर :- दक्षिण नागपूर मानेवाडा रोडवरील बजरंग नगर येथे बजरंग नगर महिला मंडळ व नवउदय वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बजरंग नगर मंगळागौरी रॉक्स ग्रुप’च्या वतीने मंगळागौरी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि सूत्रधारपद महिलांनीच सांभाळत ‘महिलांनी ठरवलं तर काय करू शकतात’ याचा दमदार प्रत्यय दिला. उत्सवासाठी महिलांनी पारंपरिक नववारी साडी परिधान करून उपस्थिती लावली. नववारीतील महिलांच्या ठसकेबाज नृत्याने कार्यक्रमस्थळी अक्षरशः जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, विविध सांस्कृतिक डान्स परफॉर्मन्स, उखाणे आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आयोजकां पासून ते व्यवस्थापना पर्यंत संपूर्ण जबाबदारी महिलांनीच यशस्वीपणे पार पारला. महिलांनी केवळ उत्सव साजरा केला नाही, तर एकत्रितपणे नियोजन करून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम उभा करून आपली संघटनशक्तीही दाखवून दिली. कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते. पारंपरिक संस्कृती, महिलांचा उत्साह आणि सामाजिक एकजुटीचा सुंदर संगम या मंगळागौरी उत्सवातून पाहायला मिळाला. प्रिया मुंदाफळे, मंदा सिंघनजुडे, रेखा माहोरे, संगीता सिंगनजुडे, आशा झलपुरे, संध्या मेश्राम, गभने, अर्पिता भोयर, रितू रेवतकर, तृप्ती मोहर, प्रिया कोहळे, श्रद्धा भंडारे, पूजा ठाकूर, माधुरी पिंपळे, सोनाली कोहळे, मनीषा भंडारे, नीलिमा इटनकर, प्रतिभा काटे, वर्षा देशमुख आदी महिला उपस्थित होत्या. महिलांनीच आयोजन केले, महिलांनीच रंगमंच गाजवला आणि महिलांनीच मंगळागौरीचा जल्लोष केला’ दक्षिण नागपूर माणेवाडा रोड बजरंग नगरचा हा उत्सव परिसरात चर्चेचा विषय ठरला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.