spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी रजनी देशपांडे यांची पाच लाखांची देणगी

यवतमाळ :- जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तथा निवृत्त जिल्हा परिषद शिक्षिका रजनी विनायकराव देशपांडे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ऐच्छिक देणगी म्हणून ५ लाख रुपये रकमेचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यवतमाळ अनिरुद्ध बक्षी यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी निवृत्त नायब तहसीलदार विनायक बळीराम थोडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते बजरंग पांडुरंग नामदेववार उपस्थित होते.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून शहीद सैनिकांच्या युद्धविधवा, युद्धात अपंगत्व आलेले सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांच्या अवलंबितांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.रजनी विनायकराव देशपांडे या नेहमीच सामाजिक संस्था तसेच विविध सामाजिक उपक्रमांना उदार अंतःकरणाने मदत करण्यासाठी तत्पर असतात. सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली पाच लाख रुपयांची देणगी ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सैनिकांप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे.

देशसेवेसाठी कार्यरत तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी दिलेल्या या अमूल्य योगदानाबद्दल जिल्हाधिकारी,विकास मिना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अनिरुद्ध बक्षी यांनी रजनी विनायकराव देशपांडे यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.