spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

– ठाणेदार मांडवधरे यांच्या तत्पर कारवाईच्या आश्वासनाने दिलासा

कन्हान :- सुपर टॉऊन प्रभाग क्र. २ येथील रहिवासी हौसालला पुंड यांच्या बक-याच्या कोठयातुन अज्ञात चोरट्याने पाच बक-या चोरी करून सुमारे एक लाखा चे नुकसान होऊन वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्याची परि स्थिती अत्यंत बिकट होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

मंगळवार (दि.१५) सप्टेंबर ला सुपर टॉऊन परिसरातील वयोवृद्ध हौसालला पुंड हे आपल्या पत्नी सोबत वास्तव्यास असुन त्यांचा मुलगा कळमेश्वर येथे पत्नीसमवेत राहतो. हौसालला पुंड हे बकऱ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराजवळील कोठयातुन पाच बक ऱ्या चोरून नेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध हौसाल ला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या प्रकरणी सुर्यभान चकोले, संतोष दहीफळकर, संदीप पोकेळे तसेच वयोवृद्ध हौसालला पुंड यांनी समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांच्या मदतीने कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. कन्हान ठाणेदार मंडवधरे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनाचा दिलाशा देत वयोवृद्ध कुटुंबाला सबुरीचा सल्ला देण्यात आला. डीबी पथका ला घटना स्थळी पाठवुन तपास सुरू करित आरोपी चोरटयाचा कन्हान पोलीस शोध घेत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.