spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोबरवाहीतील थरारक खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; मध्य प्रदेशच्या सीमेवरून आवळल्या मुसक्या

– ६ पथकांनी पिंजून काढले घनदाट जंगल; स्थानिक गुन्हे शाखा व गोबरवाही पोलिसांची संयुक्त कारवाई

हंसराज,भंडारा गोबरवाही :- गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली (मिरची टोला) येथील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व गोबरवाही पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्य प्रदेशातील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री गावाजवळ सापळा रचून अटक केली. नितेश उर्फ टिटू भलावे (वय २८, रा. कुडवा, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला आज भंडारा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी अपराध क्र.४५५/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपीने महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील बावनथडी नदीमार्गे मध्य प्रदेशात पळ काढला होता.

आरोपी पोलिसांची चाहूल लागताच वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची ६ विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी मध्य प्रदेशातील बालाघाट, सिवनी, बोनकट्टा, कुडवा, मेहकेपार, देवरी, पिपरवाणी, फुलफुला व खवास या भागातील घनदाट जंगल परिसर अक्षरशः पिंजून काढला. परराज्यातील भौगोलिक परिस्थिती व प्रतिकूल वातावरणाचा सामना करत पोलिसांनी चिकाटीने माहिती मिळवून १४ सप्टेंबर रोजी कांद्री गावाजवळ आरोपीला ताब्यात घेतले.

सदर यशस्वी कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, गोबरवाहीचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नी रवींद्र रेवतकर ,पोउपनि पाटील, पोउपनि गंगवाणी, पोउपनि गीते ,पोहवा- भोंगाडे, मस्के, चव्हाण , मन्नाडे, ठवकर ,डोयले , बेदुरकर ,गाढवे, चापोहवा-मते , पोहवा पेंदास, पोशि श्रावणकर, पोशी शहारे, पोशी काळे , पोशी साटवणे, चापोशी बागडे , पोशि गायधणे, पोशि उइके , पोशि शेळके, पोशि काहाळकर व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलिस स्टेशन गोबरवाही पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.