spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सब-ज्युनियर, ज्युनिअर व सिनिअर (मुले व मुली) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी 2026

चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सब-ज्युनियर, ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, 18 वी सब-ज्युनियर, 21 वी ज्युनिअर व 26 वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर महानगरचा संघ सहभाग करण्याकरिता दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची व चंद्रपूर महानगरची निवड चाचणी दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी रविवारला ठीक सकाळी 10:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.

दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान, व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर तसेच चंद्रपूर महानगरचे सचिव सुरज बंडूजी परसुटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे दि. चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर महानगर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल.

तरी इच्छूक खेळाडूंनी सुरज परसूटकर (8669075173), रुचिता आंबेकर (8552925066), श्रुती घटे (9403908274), हर्षल क्षिरसागर (706691570), इखलाख पठान (9834307243), चंदन परसुटकर (9970770132), ईश्वर पोर्थला (7755908124), मयूर बोनमपल्लीवार (8421726919), स्वप्नील गोंड (7757911327), भास्कर मुळे (7249232813), विशाल राठोड (9764921110), अहमद शेख (8007029426), भाग्यश्री मेश्राम (9156076952 ), निखिता ढोरके (8551062243) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणीचे नियम

01) U-17 वर्षांसाठी 01/12/2009 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

02) U-19 वर्षांसाठी 20/12/2007 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

03) खेळाडूने आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.