किशोर साहू, मौदा :- भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम माथनी येथे भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून उत्साहात आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण (रामटेक) उपाध्यक्ष तथा कार्यक्रम समन्वयक वीरेंद्र पायतोडे, दक्षता समिती, मौदा तालुका सदस्य मंगेश तिघरे, माजी सदस्या पंचायत समिती मौदा पुनम तिघरे,बूथप्रमुख माथनी स्वप्निल तिघरे, ऋषभ घोल्लर, तसेच माथनी गावातील भाजपा व भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प घेऊन भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीप प्रज्वलित करून, ‘सेवा हाच संकल्प…
राष्ट्रनिर्माण हाच ध्यास’ अशा घोषणा देत वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.





