– सिध्दांत बोध ग्रंथ पारायण अनुष्ठान समाप्ती
बेला :- उपासना ही नित्यनेमाने करावी. त्यामुळे अंतरंगात जाणीव होऊन भाव निर्माण होतो. अध्यात्म हा जीवनाचा सार आहे.असा अमूल्य उपदेश ब्रह्ममूर्ती शेषानंद पांडे महाराज यांनी उपस्थित भक्त व शिष्यांना दिला. ते बेला नजीकच्या बरबडी येथील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमात आयोजित शहामुनी ऋषी रचित श्री सिद्धांत बोध ग्रंथ पारायण अनुष्ठान समाप्ती प्रसंगी बोलत होते.
श्रावण मास निमित्य आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. त्यामध्ये सद्गुरु शेषानंद बाबांचे पावन सानिध्यात सव्वा महिना सिद्धांत बोध ग्रंथ पारायण अनुष्ठान सोहळा भक्ती व श्रद्धेच्या मंगलमय वातावरणात थाटात पार पडला. यावेळी समाप्तीला महाराजांच्या मौलिक मार्गदर्शनाने भाविक अक्षरशः मंत्रमुक्त झाले.
मनोहारी सोहळ्यात भावभक्तीचे दर्शन
समारोप प्रसंगी सर्वप्रथम रविंद्र व सुषमा गाडगे दांपत्यांचे हस्ते बाबा व गुरु आई यांचे विधीवत पुजन करण्यात आले.सिद्धांतबोध ग्रंथाचे ह.भ.प.आकाश ठाकरे महाराज,सुदर्शन कोरडे महाराज (बुटीबोरी) विवेक नान्हे महाराज(सोनेगाव),नरेन्द्र मेघरे महाराज (हिंगणघाट) व पुष्पा जांभुळे (चिंधीचक) यांनी साप्ताहिक पारायण केले.त्याबद्दल त्यांचा महाराजांनी सन्मान केला. यावेळी पाचही पारायणाचार्यांनी आपली अनुभुती कथन केली. नंतरचे अनिल दादा खामनकर महाराज (चिचाळा)यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित भक्तगण सुखावले.
समाप्ती सोहळ्यास असंख्य स्त्री,पुरुष भक्तांनी आवर्जून हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आश्रमाचे अध्यक्ष तथा ग्रामगीताचार्य ओमप्रकाश पांडे यांनी केले. भव्य महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. अनुष्ठान सोहळा यशस्वीतीसाठी प्रकाश घवघवे ,गजानन कुमरे, प्रभाकर दोडके,पुंजारी टेकाम,राजु मेघरे,पुंजाराम खिरटकर,श्रीकृष्ण खामनकर,शेषराव पोटदुखे ,हर्षल कुकडे, रामप्यारी चंदेल, सुंदर निमसडे,इंद्रदेव धोटे,कुणाल मस्के,प्रभाकर गुंडाळे व आदिनाथ गुरू माऊली सेवा मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.





