spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेतकऱ्यांचे पांदन रस्ते अन् अतिक्रमणधारकांचे पट्टे महिनाभरात मार्गी लावा; आमदार नरेंद्र भोंडेकर

– पांदन रस्ते, अतिक्रमणधारकांचे पट्टे आणि प्रॉपर्टी कार्डच्या प्रश्नांवर आढावा बैठकीत चर्चा

हंसराज, भंडारा :- भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकऱ्यांना सुविधा व्हावी या करिता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना राबवून येत्या एका महिन्याच्या आत हे पांदन रस्ते पूर्ण करण्याचे निर्देश आम. नरेंद्र भोंडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस ते समिती चे अध्यक्ष म्हणून संबोधित करीत होते. याच प्रमणे दोन्ही तालुक्यातील अतिक्रमण धारकांना एका महिन्याच्या आत पट्टे आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले.

स्थानिक तहसील कार्यालयात आज मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना आणि अतिक्रमण नियमानुकुल समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. आम. नरेंद्र भोंडेकर हे या दोन्ही समितीच्या अध्यक्ष पदावर असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या बैठकीत संबंधित रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पांदन रस्ते संदर्भात उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आता पर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा आढावा दिला व पुढील नियोजनाची माहिती सादर केली. या वेळी आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले कि भंडारा पवनी या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पांदन रस्त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या येत्या एका महिन्याच्या आत दूर झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुलभ व बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आम. भोंडेकर यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन त्यांच्या वेळेची, श्रमाची व खर्चाची बचत व्हावी आणि शेतीच्या विकासाला अधिक बळ मिळावे, या करिता मागेल त्याला पांदन रस्ते देवून शेत पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश ही दिले. सोबतच काही पांदन रस्ते हे अस्तित्वात आहेत परंतु नकाश्यात ते रस्ते दिसून येत नाहीत, अश्या रस्त्यांचे सर्वे करून त्यांचा आराखडा तयार करा आणि यांना लवकरात लवकर नकाश्यात सामील करण्याचे निर्देश या वेळी आमदार भोंडेकर यांनी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.