spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

पंकज परशुरामकर प्रतिनिधी,नवेगाव बांध :-शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सावरटोला/बोरटोला परिसरात घडली. नामदेव शिवा डोये (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव डोये हे दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता नित्याप्रमाणे आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी घरून गेले होते. शेतातील विहिरीजवळ पाहणी करत असताना अचानक पाय घसरल्याने ते विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, त्यांचा मुलगा कार्तिक हा कामानिमित्त भंडारा येथे गेला होता, तर नात शिक्षणासाठी नवेगाव बांध येथे गेली होती. सायंकाळपर्यंत नामदेव डोये घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शेतशिवार तसेच गाव परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, रात्रीपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता शेतातील विहिरीत शोध घेत असताना मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर सावरटोला येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव डोये यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा व दोन भावंडांसह मोठा आप्तपरिवार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.