– यंदा प्रथमच या पावसाने नाले ओसंडून वाहले
किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. 18 सप्टेंबर)ला सायंकाळ दरम्यान कुठे एक तास तर कुठे दोन तास तर कुठे तासनतास विजांच्या कडकटांसह मुसळधार पाऊस झाल्याचे मौदा तालुक्यातील अनेक गावातील तर मौदा तालुक्यातील सीमेवरील स्थित पारशिवनी तालुका अंतर्गत येणाऱ्या निलज व खंडाळा (घटाटे), रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत बोरी (राणी )अंतर्गत येत असलेल्या खेडी येथील शेतकरी व नागरिकांनी आज शनिवार ( ता. 19 सप्टेंबर)ला सकाळी वृत्तपत्र वाटत असताना सांगितले. बोरी (सिंगारदीप ) ते निलज पांधण रस्त्यावर बनवण्यात आलेला नाला यंदा प्रथमच ओसंडून वाहत असल्याचे बोरी (सिंगारदीप) येथील नागरिकांनी सांगितले. तर मौदा तालुक्यातील अनेक गावातील नालेही ओसंडून वाहताना दिसले.





