spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भरधाव कार डिव्हायडर वर आदळली ; चालकासह कुटुंबातील सदस्य जख्मी

– पेट्रोल पंपासमोरील घटना; निष्काळजी वाहन चालका विरुद्ध पोलिसांत तक्रार

कन्हान :- शहरातील पेट्रोल पंपासमोर नागपुर – जब लपुर मार्गावर भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवि ण्यात आलेली कार डिव्हायडरला धडकल्याची घटना शुक्रवार (दि.१८) सप्टेंबर ला रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील चालकासह कुटुंबातील काही सदस्य व लहान मुले जख्मी झाल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार अमोल धर्मराज भुसारी वय ३५ वर्ष, रा. सुपर टाऊन कन्हान हे टाटा एस वाहन क्र. एमएच ४० सीटी ३५९३ घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात होते. पेट्रोल पंपासमोर वाहन उभे असताना त्यांना अचानक मोठा आवाज ऐकु आला. त्यांनी वाहनातुन उतरून घटनास्थळी पाहिले असता एमपी २० झेडजी ७४३७ क्रमांकाची कार डिव्हायडरला धडकलेली दिसली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने कारची डिव्हायडरला जोरदार धडक बसली. कारमध्ये चालकासह कुटुंबातील सदस्य व लहान मुले प्रवास करीत होती. अपघातात त्यांना दुखा पत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला फोन करून जख्मींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालक परसराम ठाकुर, रा. छपारा, सिवनी (मध्य प्रदे श) असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरणी अमोल भुसारी यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिली असुन एमपी २० झेडजी ७४३७ वाहन चालकाविरुद्ध भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवुन अपघात घडविल्या बाबत तक्रार नोंदवि ण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.