किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथील श्री ऋषी महिला सेवा संस्था व ग्रामस्थ मंडळी तर्फे श्री क्षेत्र संगम मोक्षधाम परिसर चाचेर येथे ऋषी पंचमी उत्सव मंगळवार (ता. 15 सप्टेंबर)ला शांततेत व उत्साहात साजरे करण्यात आला.
मंगळवार (ता. 15 सप्टेंबर)ला सकाळी 6 वाजता नागद्वार भक्तातर्फे नागद्वाराची महाआरती करण्यात आली. सकाळी 9:30 वाजता वाणीभूषण ह भ प यश महाराज निंबाळकर (आळंदी देहू जि. पुणे) मु. झुणकी सावळी ता. कळमेश्वर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री भोजराज बावणे यांच्या राहत्या घरून निघून हरिनामाच्या गजराने श्री क्षेत्र संगम चाचेर समारोप करण्यात आला.
सर्व भाविकांनी कार्यक्रम व महाप्रसादाच्या लाभ घेतला. याप्रसंगी पंचायत समिती मौदा माजी उपसभापती खेमराज चाफले, किरण बरबटे, रामू खंडाईत, चाचेर पोलीस पाटील ज्ञानेश्वर नाकाडे ,देवा अढावू, संजय अढावू, चरणदास बावनकुळे , सुरेंद्र टेंभरे,अशोक कुल्लरकार ,गणेश खंडाईत ,रंजना वानखेडे, शालू हूड, वंदना लांजेवार ,राधा कोपरकार, मंगला कोपरकार, गीता कुल्लरकार ,छाया लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ऋषी महिला सेवा संस्था अध्यक्ष तुळसा रेवा अढाऊ, उपाध्यक्ष सोनू संजय अढाऊ,सचिव छाया दिनकर कुल्लरकार, सहसचिव वनश्री विष्णू टेंभरे, कोषाध्यक्ष सुनंदा श्यामराव वानखेडे ,सदस्य जयश्री राजेंद्र वानखेडे, कुसुम देवराव अढाऊ, ज्योत्सना शिवशंकर साखरवाडे, मीरा गजानन जांबुदकर, हिरा ज्ञानेश्वर टेंभरे, लक्ष्मी प्रभाकर आंबीलढुके, रेवा नामदेव अढाऊ, विष्णू नामदेव टेंभरे शिवशंकर साखरवाडे सह समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.





