किशोर साहू, मौदा :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धनी येथे बाल गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीगणेश मंदिरात श्री गणेश उत्सव सुरू आहे.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी बाल गणेश उत्सव मंडळ धनीचे पदाधिकारी आकाश नेवारे, नितीन वडीचार, महेश गुडेवार ,नरेंद्र नेवारे ,चुन्नीलाल झाडे ,संतोष नागपूरे, पुना बुराडे ,सागर मडावी, सौरभ मडावी ,अमित कावळे ,सचिन हरकंडे सोहम माटे, मनोज किनेकार, राजेन सारवे, भावेश मडावी ,प्रणय मडावी, शुभम टेकाम, विक्की टांगले, विलास कावळे, अरविंद मडावी, अंकित कूर्वे परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.





