किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता.१९ सप्टेंबर ) ला महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तारसा माथनी जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सिंगोरी, सावरगाव व कोपरा येथे मंजूर समाज भवन कामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
गावागावातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या विकासकामांच्या माध्यमातून सामाजिक सुविधा आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

याप्रसंगी टेकचंद सावरकर माजी आमदार कामठी- मौदा विधानसभा क्षेत्र,राजा तिडके नगराध्यक्ष नगर पंचायत मौदा,नरेश मोटघरे उपाध्यक्ष भाजपा जिल्हा ग्रामीण,कीर्ति पायतोडे माजी पं. स. सदस्य,खुशाल तांबडे उपाध्यक्ष, खरेदी-विक्री संघ मौदा,शिवराज माथुरकर महामंत्री भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण (रामटेक), विरेंद्र पायतोडे उपाध्यक्ष भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण (रामटेक), मंगेश तिघरे सदस्य, दक्षता समिती मौदा, बंटी हटवार अध्यक्ष भाजयुमो मौदा शहर, अजाब टेकाम माजी सरपंच गट ग्रामपंचायत नरसाळा,सचिन राऊत माजी उपसरपंच, गट ग्रामपंचायत नरसाळा,यांच्यासह अध्यक्ष, बूथप्रमुख, भाजपा-भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





