– नगराध्यक्ष अजय रूपनारायण अग्रवाल यांचा सहभाग; ‘जय बाबा री’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर
कामठी :- भाद्रपद शुक्ल पक्ष दशमीच्या पावन पर्वानिमित्त श्री रामदेव बाबा सेवा समितीच्या वतीने सोमवारी कामठीत गुणगान ध्वजा यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. जुनी ओली येथील श्री रामदेव बाबा मंदिरापासून निघालेल्या या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
नगर परिषद कामठीचे अध्यक्ष अजय रूपनारायण अग्रवाल यांनी यात्रेत सहभागी होऊन श्री रामदेव बाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कामठी शहरातील नागरिकांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली.
हातात भगव्या ध्वजा घेऊन मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात तसेच भक्तिगीतांच्या तालावर भाविकांनी नृत्य करीत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. ‘जय बाबा री’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
यावेळी प. पू. बापजी तेजराजजी जैन, डॉ. राजेंद्र अग्रवाल, रामकिशन खंडेलवाल, राजेश (लाला) खंडेलवाल, उमाशंकर अग्रवाल, सुशील शर्मा, राजकुमार गर्ग, मन्नू मूंधडा, अजय पांचोली यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





