– भागनिहाय सुनावणी केंद्र निश्चित; संबंधित मतदारांनी BLOशी संपर्क साधून उपस्थित राहण्याचे आवाहन
संदीप कांबळे,कामठी :- नगरपरिषद कामठी अंतर्गत मतदार यादी सुधारणा व सुनावणी प्रक्रियेला वेग आला असून, यादीतील विविध भागांसाठी स्वतंत्र सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि सुनावणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. संबंधित मतदारांनी आपल्या यादी भागानुसार निश्चित केलेल्या सुनावणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीतील नोंदी, दुरुस्ती, हरकती अथवा अन्य संबंधित बाबींसाठी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून सुनावणीची आवश्यक माहिती घ्यावी. प्रशासनाने भागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून सुनावणीची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्याकडे यादी भाग क्रमांक ५४, ५६, ५७, ५८ व ९६ ची जबाबदारी असून, सुनावणी स्व. राजीव गांधी सभागृह, पोरवाल पार्क येथे होणार आहे. राजेश्वरी दळवी यांच्याकडे भाग क्रमांक ५९ ते ६५, तर रत्नमाला फटिंग यांच्याकडे भाग क्रमांक ८१, ८३ ते ८८ची जबाबदारी देण्यात आली असून, या भागांची सुनावणीही पोरवाल पार्क येथील सभागृहात होणार आहे.
महेश चोबे यांच्याकडे भाग क्रमांक ६६, ६८ व ६९ आणि आदित्य शिवेकर यांच्याकडे भाग क्रमांक ७० ते ७६ची जबाबदारी असून, त्यांची सुनावणी नगरपरिषद नवीन इमारतीत होणार आहे. संतोष खोब्रागडे यांच्याकडे भाग क्रमांक ७७, ७८, ७९, ८० व ८२ची जबाबदारी असून, सुनावणी नगरपरिषद ई-लायब्ररी, हमालपुरा येथे होणार आहे.
सारिका धात्रक यांच्याकडे भाग क्रमांक ८९ ते ९४ची जबाबदारी असून, सुनावणी प्रशिक्षण संस्था, रविदास नगर येथे होणार आहे. डॉ. अजहर अबरार यांच्याकडे भाग क्रमांक ९५, ९७, ९८ व ११३, तर डॉ. नितीन मेश्राम यांच्याकडे भाग क्रमांक १२६ ते १३३ची जबाबदारी आहे. या भागांची सुनावणी सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, छावणी येथे होणार आहे.
डॉ. जे. व्ही. रामटेके यांच्याकडे भाग क्रमांक ९९ ते १०३ आणि देवेंद्र कावडकर यांच्याकडे भाग क्रमांक १०४ ते १०८ची जबाबदारी असून, या भागांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रविदास नगर हे सुनावणी केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
विजयकुमार आत्राम यांच्याकडे भाग क्रमांक १०९ ते ११२ व ११४ची जबाबदारी असून, सुनावणी पोरवाल पार्क येथील स्व. राजीव गांधी सभागृहात होणार आहे. एस. व्ही. कोंबे यांच्याकडे भाग क्रमांक ११५ ते १२५ आणि डॉ. जे. एस. ढवरे यांच्याकडे भाग क्रमांक १३४ ते १३७ची जबाबदारी असून, संबंधित सुनावणी नगरपरिषद ई-लायब्ररी, हमालपुरा येथे होणार आहे.
तर डॉ. आर. एल. रॉय यांच्याकडे भाग क्रमांक ५५, ६७ व १३८ ते १४२ची जबाबदारी असून, या भागांची सुनावणी सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, छावणी येथे होणार आहे.
मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत संबंधित नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याने, आपल्या यादी भागाची माहिती घेऊन नियुक्त अधिकारी अथवा BLOशी संपर्क साधावा आणि सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





