spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

16 वर्षीय कुमारिका झाली चार महिन्याची गर्भवती

– अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील हरदास नगर रहिवासी 20 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून चार महिन्याची गर्भवती केल्याची घटना नुकतीच निदर्शनास आली असून यासंदर्भात पीडितेच्या आजीने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचे नाव भावेश राजेश मेश्राम (वय २०, रा. हदरास नगर, कामठी) असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षांची असून, ती डिसेंबर २०२५ पासून आरोपीच्या संपर्कात होती. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे उपचारासाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पीडितेने कुटुंबीयांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यावरून पीडितेच्या आजीने २१ सप्टेंबर रोजी जुनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६५(१) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.