अमरावती :- बेरारमधील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील कोळी महादेव नागरिकांना एसटी जात प्रमाणपत्र मिळण्याची क्लिष्ट प्रक्रिया सुलभ करून, प्रलंबित प्रकरणांवर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र वितरीत व्हावे. असे आदेश द्यावेत, अशी मागणी उमेश महादेवराव ढोणे यांनी महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. त्यांनी आज जनता दरबारआयोजित केला होता.यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर.जिल्ह्यातील ईतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत समाज हिताचा निर्णय घ्यावा. ढोणे यांनी दिलेल्या निवेदनमध्ये नमूद केले आहे .उपलब्ध शासकीय व ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देऊन समाजहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच रस्ते,शाळा परिसर वॉल कंपाऊंड बांधकाम करण्यात यावे हे सुद्धा मागणी करण्यात आली.





