कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या सन २०२६-२७ च्या शालेय नागपूर ग्रामीण स्तरीय क्रीडा महोत्सव अंतर्गत कामठी तालुक्यातील आजनी येथे सोमवार दिनांक २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रथम आणि द्वितीय दिवसाच्या फायनल स्पर्धेचे उद्घाटन नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेतभाऊ बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिल बोरावार, तालुका क्रीडा अधिकारी योगेंद्र खोब्रागडे, कामठी पोलिस ठाण्याचे पी आय महेश आंधळे, माजी आमदार देवराव रडके, भगवंतराव रडके, अनिल निधान, माजी सभापती उमेशभाऊ रडके, सरपंच हेमराज दवंडे, पोलिस पाटील बळवंतराव रडके, अलका राहूल शेळके, नितीन रडके, तुषार रडके, गादा येथील पोलिस पाटील वंदना चकोले, नीरज रडके, विश्वेश्वर पाटील, जगदीश शाहू, घनश्याम चकोले, लीलाधर दवंडे, धर्मराज हेटे, कृष्णा दवंडे, गजेंद्र ढोक, अशोक हिवरकर, सुधाकर विघे, ग्राम पंचायत सदस्य आदींची विशेष उपस्थिती होती. प्रथम दिवशी १४ वर्ष वयोगटातील १३ संघांनी यात सहभाग नोंदवल होता. यात मुलांच्या संघातील प्रथम क्रमांक उमरेड तालुक्याने पटकावला तर द्वितीय क्रमांक काटोल तालुक्यातील मुलांनी पटकावला. मुलींच्या संघात प्रथम क्रमांक पारशिवनी ( नवेगाव ) तालुक्याने मिळविला तर द्वितीय क्रमांक सावनेर तालुक्यातील शाळेने पटकावला.
दुसऱ्या दिवशी १७ वर्षे वयोगटातील १३ तालुक्यातील संघांनी सहभाग नोंदवला.
यात मुलांच्या स्पर्धेतील प्रथम क्रमांक कामठी या तालुक्यातील शाळेने पटकावला तर द्वितीय क्रमांक पारशिवनी या तालुक्यातील शाळेने पटकावला. मुलींच्या स्पर्धेत हिंगणा या तालुक्यातील संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर द्वितीय क्रमांक रामटेक या तालुक्यातील संघाने मिळविला.
आयोजनाची, संचालनाची तसेच पंचांची जबाबदारी धनराज भाऊ निंबाळकर, प्रवीण किचर, खुशाल येलेकर, राहूल शेळके, कवडू चिंचुलकर, आदित्य चिंचुलकर, श्रवण लाडस्कर, स्वप्नील बावणे, शुभम वाणी, जवाहर ठाकरे, राकेश झलके, प्रज्ज्वल देशमुख, ऋषिकेश भोयर, भूषण मुलकर, सौरभ चौके, सोनटक्के, अनिकेत भोयर, यांच्यासह सर्व मंडळांचे खेळाडू तसेच आजनी गावातील समस्त कार्यकर्त्यांनी सांभाळली.
उपविजेता प्रत्येक संघांना आयोजकांतर्फे सन्मानचिन्ह देऊन प्रेरित करण्यात आले. बुधवारी या स्पर्धेचा अंतिम सामना असेल. या स्पर्धेचा आनंद जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





