किशोर साहू, मौदा :- भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी स यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम तांडा येथे माजी उपसरपंच ग्रा.पं. तांडा चंद्रशेखर जाधव यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी शाखा तांडा च्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चंद्रशेखर जाधव अध्यक्ष भाजपा अ.जा.मौदा तालुका ,श्रीगंगाधर डोरले अध्यक्ष तंटामुक्त समिती तांडा, शंकर भूरे अध्यक्ष भाजपा तांडा, राहुल डोरले, जनार्धन गिरीपुंजे, मधुकर डोरले ,दिनेश थोटे, सचिन किनेकर ,वैभव डोरले, रामू येळणे, ओमप्रकाश वरखडे गणेश कोहडे, फुलचंद गेडाम, रविंद्र पाठक ,रमेश गेड़ाम व तांडा येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





