किशोर साहू, मौदा :- सोमवार (ता.21 सप्टेंबर) ला ग्रां. प. चाचेर अंतर्गत अंगणवाडी क्र. 4 मध्ये ‘लोकप्रतिनिधी दिवस’ साजरा करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष योगराज घोरपडे माजी ग्रामपंचायत सदस्य, शैलेश कोपरकर सदस्य ग्रां. प. चाचेर, सुरेंद्र टेंबरे ग्रां. प. सदस्य, वनश्री टेंभरे माजी सदस्य ग्रामपंचायत, आयुर्वेदिक डॉक्टर मेश्राम , अंगणवाडी सेविका बीसणे , नगरे , श्रोते , बावनकुळे , हुमणे तसेच गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी परिसरामध्ये एक पेड माँ के नाम या संकल्पनेतून आंब्याचे झाड लावण्यात आले.





