spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तरोडी बु. येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीची पाहणी

कामठी :- ग्रामपंचायत तरोडी बु. येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीने भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध स्वच्छता व विकासकामांची सविस्तर पाहणी केली.

तपासणी समितीचे अध्यक्ष विजय जायकर, अवर सचिव, पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गेश सोनजे, कक्ष अधिकारी तथा सदस्य सचिव, तपासणी समिती, योगेश यलमार, कक्ष अधिकारी तथा तपासणी समिती सदस्य आणि शशिकांत शेवगेकर, सहाय्यक कक्ष अधिकारी तथा तपासणी समिती सदस्य, पाणीपुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ग्रामपंचायतीची पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद नागपूर स्तरावरून डॉ. कमल किशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,  कुणाल उंदीरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, तसेच गटविकास अधिकारी पियुष डोंगरे साहेब आणि विस्तार अधिकारी पंचायत प्रवीण गावंडे, पंचायत समिती कामठी उपस्थित होते.

तपासणीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत अभियानातील निर्देशांकानुसार करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीने घेतली. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, महिलांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांची उपलब्धता व गुणवत्ता तसेच ग्रामस्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध बाबींची पाहणी करण्यात आली.

ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले.

कार्यक्रमास सरपंच आरती प्रवीण चिकटे, उपसरपंच सारिका सनकाडे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश येवले,  रुपेश डेरे, सुनील चिकटे, ममता बोपचे, प्रतिभा महल्ले, शीला चिकटे तसेच ग्रामपंचायत अधिकारी उमेश विष्णूजी धावडे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मासोदकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी उमेश विष्णूजी धावडे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.