spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजर्षी शाहू महाराज मानधन समितीच्या सदस्यांचा सत्कार

– काटोल-नरखेड तालुक्यातील कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

नरखेड, प्रतिनिधी :- भारतीय लोककला सांस्कृतिक संघटना, नागपूरच्या वतीने राजर्षी शाहू महाराज मानधन समितीच्या सदस्यांचा सत्कार समारंभ काटोल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी काटोल-नरखेड तालुक्यातील कलाकारांच्या वतीने प्रकाश काळे (गुरुजी), संजय भाकरे आणि पुरुषोत्तम धोटे यांचा उत्स्फूर्तपणे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लोककला सांस्कृतिक संघटना, नागपूरच्या कोषाध्यक्ष जयश्री धोटे, राष्ट्रीय सदस्य बंडू तभाने, काटोल अध्यक्ष जयपाल उमाठे आणि राष्ट्रीय सदस्य शुभांगी वालके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाहीर सुनील डाहाट, सुरेशराव धोटे, देविदास घायवट, तानबा सिंगारे, महादेवराव बारसकर आणि नामदेवराव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय कलाकार व मान्यवरांमध्ये शरदराव धोटे, प्रभाकर कालमेंग, रवींद्र मुसले, रामेश्वर लोहे, युवराज आमले, अमोल बारसकर, लोकेश फुले, सुमित कोंघे, योगेश ढबाले, ज्ञानेश्वर तायवाडे, नरेंद्र धवराल, नितीन तायवाडे, रामभाऊ वानखडे, शीला ठाकरे, गंगा आगे, मारुतराव आगे, पुष्पा सावरकर, गोपाल भिसे, यमुना पिरोडिया आणि वर्षाताई मोरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी वालके यांनी केले. प्रास्ताविक बंडू तभाने यांनी केले, तर आभार जयश्री धोटे यांनी मानले. कलाकार व मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.