रमानगरमध्ये घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

0
3

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रमानगर परिसरातील एका घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे धक्कादायक घटना उघडकीस आली. घरात नथ्थुलाल सोलंकी यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह दोन दिवसांपासून घरात असल्याचे सांगण्यात आले.

घरातून सातत्याने दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.

मृतक नत्थुलाल सोलंकी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ते घरात किती काळापासून होते आणि मृत्यूच्या परिस्थितीमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.