spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हर्ष पोद्दार यांनी घेतली कळमेश्वरमधील उद्योजकांची बैठक

 

कळमेश्वर १२ : नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी आज, ११ ऑगस्ट २०२५ रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उद्योजकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी उद्योजकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने त्यांचे निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करून योग्य त्या सूचना केल्या.

या बैठकीला नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, सावनेर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सागर खरडे आणि कळमेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ३५ ते ४० प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

Popular Articles