spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोरडा येथे रोवणी यंत्राद्वारे झाले प्रात्यक्षिक

आत्मा अंतर्गत यंत्राद्वारे पन्नास एकर वर धानाची रोवणी

सचिन चौरसिया, रामटेक १२ :- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील बोरडा गावामध्ये रोवणी यंत्राद्वारे सक्षम शेतकरी स्वयंसहायता गटातील सदस्य  सुरेंद्र धारणे यांच्या शेतावर रोवणी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. प्रात्यक्षिकाचे तसेच कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश दोनोडे यांनी केले होते.
कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहणे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र दमाहे,  जयश्री उमाळे तंत्र अधिकारी सोबत विवेक गजभिये , कुमारी वाघमारे मॅडम , बंडू पाटील, गटाचे अध्यक्ष  प्रतीक ठाकूर व गटातील अन्य सदस्य या प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपस्थित होते, हा कार्यक्रम आत्मा अंतर्गत ५० प्रात्यक्षिक , ५० एकरवर, व ५० शेतकऱ्यांकडे घेण्यात आला . रोवणी यंत्राद्वारे रोवणी केली असता बियाणे, वेळ , तसेच मजुरावर होणाऱ्या खर्चामध्ये  मध्ये ७०% टक्के नी बचत होते असे गटाचे अध्यक्ष  प्रतीक ठाकूर यांनी प्रत्यक्षरीत्या समजावून सांगितले तसेच येणाऱ्या काळामध्ये यंत्राद्वारे रोवणी करणे ही काळाची गरज आहे व ती करावीच लागणार आहे हे ठोकपणे सांगितले

Popular Articles