spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दक्षिण नागपुरात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा

– विविध राजकीय पक्षांतील २५० ते ३०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; संघटन बळकटीसाठी एकजुटीचे आवाहन

नागपूर :- दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष विशाल कोरके आणि उपशहर प्रमुख धम्मा सोनटक्के यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात विविध राजकीय पक्ष व संघटनांशी संबंधित सुमारे २५० ते ३०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आयोजकांचा दावा आहे. त्यामुळे दक्षिण नागपुरातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला या कार्यक्रमामुळे चालना मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, शिवसेना आमदार कृपाल तुमाने तसेच जिल्हाप्रमुख व नगरसेवक सुरज गोजे यांच्या हस्ते नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे गळ्यात शिवसेनेचा गमछा टाकून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांना संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सामान्य नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याची गरज व्यक्त केली. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये संघटना अधिक मजबूत करणे, युवक व महिलांसह समाजातील विविध घटकांना संघटनेशी जोडणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा सहभाग या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, आम आदमी पार्टी, भाजप तसेच विविध स्थानिक गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आयोजकांनी दिली. गौरव तिजारे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांच्या नेतृत्वात राहुल शाहू, राहुल सुटले, रोहित परतेकी, अनिकेत मस्के, शैलेश दिलीप साठोणकर, मोहन दीपक लाडसे, शानू राऊत, हर्ष गोजे, संकेत ठाकरे, बादल आगम, संकेत कांबळे, लोकेश कुंभारे, सचिन धार्मिक, यश ढोबळे आणि गौरव नायगावकर यांनी प्रवेश केला. आझाद ठाकूर (काँग्रेस गट) यांच्या गटातील विभोर भगत, अनंत वाघमारे, राहुल भगत, प्रतिभा भगत, स्वाती पाटील, सरला मून, यमुबाई गेडाम, रेखा डोये, ललिता मडके, कांबळे, योगेश गोले, प्रतीक नगराळे, हेमंत मेश्राम, सुरज तावडे, आयुष्यमान सोनारे, नितीन मेश्राम, हिमांशू मेश्राम, मीनाक्षी लांडगे, अश्वजीत बागडे, सौरव यादव, यश मानकर, यशपाल आणि ऋषी रगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अतुल डहाके गटातील कमलेश भाडेकर, अमन मोरकर, निलेश शास्त्रकार, रोशन पंचबाई, अनिकेत वाघाटकर, रोशन पंचभाई, प्रमोद बोंदरे, पप्पू मंडल, पवन इटलकर, संकेत शेंडे, शिवम कांबळी, आयुष लाडीकर, अमर लाडीकर, हर्षल कांबळी, धीरज कांबळे, शुभम मून, तुषार बनसोड, आदर्श बोरकर, रोशन धुराडे, यश नखाते, राहुल डहाके, राहुल बावनकुळे, तुषार चौधरी, कृष्णा मिरासे, अरविंद चव्हाण, प्रकाश भैसवार, राहुल बावणे आणि अमित बोरकर यांनी प्रवेश केला. विशाल मानकर (आम आदमी पार्टी) गटातील प्रीती विशाल मानकर, निशा बाजगे, संध्या खापरे, सुवर्णा खेरडे, प्रियंका बनसोड, राजेश वाजगे, प्रवीण खापरे आणि विनोद काकडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रत्नाकर कांबळे (भाजप) गटातील नितेश कांबळे, सविता कांबळे, स्वप्निल काटोले, साजिद शेख, जयश्री ठाकरे, संध्या खापरे, राम जोशी, दिनेश हेडाऊ आणि नलिनी काटोले यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय शुभम करमरकर गटातील रवींद्र लांजेवार, अरुण पडोळे, अनंता मुळे, बबनराव कालभूत, संजयजी पाचडकर, जगदीश देवकर, तुषार ठाकरे, मयूर मानकर, अशोक मंडपे, मनीश अतकरे आणि सनी मस्के यांनी पक्षप्रवेश केला. प्रशांत धावंडे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाला नगरसेवक गणेश चर्लेवार, शहरप्रमुख समीर शिंदे, बंडू तळवेकर, माजी नगरसेविका अलका दलाल, माजी नगरसेवक अजय भाऊ दलाल, महिला शहर संघटिका निलिमा ताई शास्त्री, उज्वला उमरे, नलिनी सदावरती, अनिता डोमळे, रूपाली लाखे, शंभरकर, देशपांडे, रामदास उमरे तसेच स्थानिक लोकाधिकार सेनेचे अध्यक्ष राजा रामद्वार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्यांचे योगदान या पक्षप्रवेश सोहळ्याच्या आयोजनासाठी निरंजन नाकाडे, पवन वाघमारे, पंकज ढोबळे, किरण शेळके, विनोद चकोर, राहुल पांडे, रुपेश ठाकरे, राकेश भोंदले, उज्वला उमरे, नलिनी सदावरती, रूपाली लाखे, अनिता डोमडे आणि सोनाली उमरे यांनी सहकार्य केले. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आगामी काळातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Popular Articles