spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पूर्व विदर्भातील उर्वरित तालुके दुष्काळी घोषित करा

– शिवसेना ओबीसी विभागाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रवीण डी.कळंबे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर :- पूर्व विदर्भातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची तातडीने दखल घेऊन अद्याप दुष्काळी तालुके म्हणून घोषित न झालेल्या उर्वरित तालुक्यांची पाहणी करून त्यांनाही दुष्काळी तालुके म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसेना ओबीसी विभागाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रवीण डी. कळंबे यांनी केली आहे. यासंदर्भात कळंबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या माध्यमातून हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करीत आहेत. यापूर्वी शासनाने काही तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश केला असला, तरी त्यातून वगळण्यात आलेल्या तालुक्यांमध्येही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने केवळ घोषित तालुक्यांपुरते मर्यादित न राहता परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे.

विशेषतः गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी प्रवीण कळंबे यांनी केली आहे.

दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शेती उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्वेक्षण करून पात्र तालुक्यांना दुष्काळी घोषित करावे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Popular Articles