spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गांगणेर येथे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे देण्यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मागितले शेतकऱ्यांना मागणी पत्र 

किशोर साहू, मौदा :- सोमवार (ता. 28 सप्टेंबर)ला गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) अंतर्गत येत असलेल्या गांगणेर येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत शेतकऱ्यांना मोहरी, चिया सीड, जवस , उन्हाळी मुंग व मक्का बियाणे 100% अनुदानावर देण्यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मागणी पत्र घेतले .तसेच महिला सक्षमीकरण अधिनियम 2026 नुसार महिला शेतकरी प्रमाणपत्र बाबत सभा घेण्यात आली. महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी करण्यात आली. याबाबत सरपंच अनिता श्रीधर चिंचूलकर व माजी सरपंच प्रदीप राऊत यांना गावात दवंडी देण्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी प्रशांत शेंडे (ATM) आत्मा , भिमराव जुमडे कृषी सेवक गांगनेर, प्रदीप राऊत माजी सरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी व शेतकरी उपस्थित होते.

Popular Articles