किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चाचेर येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या परिसरात इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध वृक्षांची रोपे लावण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल गडपायले यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचे महत्त्व पटवून दिले. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद रविंद्र घुगे,भारती साखरकर,संगीता बालकोटे, प्रिती खंगार,शिल्पा उकुड्डे,परविन शेख, रुचिला खंडाईत व नेहा निमजे यांनी सहकार्य केले.
“आजचे रोप म्हणजे उद्याची सावली; वृक्षसंवर्धन हीच काळाची गरज आहे,” असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिला.








