spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वंचित मुलांसाठी शिक्षणाचे नवे दालन; कामठीत ‘हुतात्मा स्मारक वाचनालय’चे उद्घाटन

कामठी :- वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी करून घेण्यासोबतच नागरिकांमध्ये वाचनाची संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने नगरपरिषद कामठीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘हुतात्मा स्मारक वाचनालय’ सुरू करण्यात येत आहे. या वाचनालयाचा उद्घाटन सोहळा २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारक, नगरपरिषद कामठी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या वाचनालयात नागरिकांसाठी विविध विषयांवरील अवांतर वाचनाची पुस्तके, तर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ व अभ्यासाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे महागडी पुस्तके उपलब्ध न होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वाची सुविधा मिळणार आहे.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शिक्षण, वाचन आणि ज्ञानप्रसाराला चालना देणारा हा उपक्रम नगरपरिषदेच्या सामाजिक बांधिलकीचा भाग ठरत आहे. वाचनालयाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद कामठीच्या वतीने मुख्याधिकारी विनोद जाधव,नगराध्यक्ष अजय अग्रवाल व प्रशासन अधिकारी महेश चोबे यांनी केले आहे.

Popular Articles