spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गट ग्रामपंचायत खंडाळा (पिपरी )अंतर्गत येणाऱ्या खंडाळ्याचा राजा मस्कऱ्या गणपतीचे थाटात आगमन

किशोर साहू, मौदा :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत खंडाळा(पिपरी) अंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावात सलग ६७व्या वर्षी विराजमान होणाऱ्या ‘खंडाळ्याचा राजा मस्कऱ्या’ गणपतीचे मंगळवारी (दि. २९) भक्तिमय वातावरणात आगमन झाले. हनुमान मंदिरापासून गणपती स्थापना परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शारदा भजन मंडळाच्या ढोलकीच्या तालावर भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मिरवणुकीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

गणेशोत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी खेळ, बुद्धिमत्ता चाचणी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यासोबतच शारदा भजन मंडळ आणि हनुमान भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

‘खंडाळ्याचा राजा मस्कऱ्या’ गणपतीची परंपरा अनेक वर्षांपासून गावकऱ्यांनी जपली आहे. बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या सहकार्याने गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील नागरिक, युवक आणि गणेशभक्त आपापल्या परीने सहकार्य करण्याचे नियोजन करीत आहेत. परंपरा आणि भक्तीचा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला आहे.

Popular Articles