– नागपुरात सत्कार
– अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश सचिवपदी सूरज येवले यांची नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेस पार्टी, नागपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाने दिलेली नवी जबाबदारी ही त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल असल्याची भावना यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सत्कार समारंभात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूरज येवले यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनुसूचित जाती समाजातील विविध प्रश्न, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रदेश सचिवपदाची जबाबदारी मिळाल्या नंतर सूरज येवले यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच समाजातील विविध घटकांशी संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेसच्या विचारधारेनुसार सामाजिक समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करण्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध सेलचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सूरज येवले यांच्या नियुक्तीचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.








