spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत कार्यालय चाचेर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. 2 ऑक्टोबर) ला ग्रामपंचायत कार्यालय, चाचेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी सरपंचा लुंबिनी महेश कलारे , ग्रामपंचायत पदाधिकारी व समस्त ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांनी केलेल्या महान कार्यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकार, सुरेंद्र टेंभरे, चंद्रकला धोटे, ग्रामपंचायत लिपिक चंद्रशेखर देवगडे,रामानंद खडसे, उत्तम पाटील, गुणरत्न हुमणे, अमरदीप अडकणे, आकाश राऊत, आरोग्य सेविका इंदू किटे, अंगणवाडी सेविका पुष्पा बिसने, रंजना नगरे, वैशाली श्रोते, शीतल बावनकुळे, विमल हुमणे, आशा वर्कर इंदू बागडे, प्रतिभा हुमणे, सीमा पेठे,सविता बावणे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अरुण काळे, राजू महादूले आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles