spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिल्लीच्या राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये बोथलीचा विवेक रेहपाडे; भंडारा जिल्ह्याचा मान वाढवणार

हंसराज,भंडारा बोथली :- भारतीय वायुसेनेतर्फे घेण्यात येणाऱ्या “सेखो इंडियन एअरफोर्स मॅराथॉन” दिल्लीमध्ये बोथली गावचे सुपुत्र प्रतिनिधित्व करणार आहेत. ते जगातील सर्वात उंचीवर रस्ता बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविणाऱ्या सीमा सडक संगठन सामान्य राखीव अभियांतिकी दलात (BRO / GREF) कार्यरत आहेत.

भारतीय वायुसेनेचे वीर अधिकारी फ्लाईंग ऑफीसर निर्मलजित सिंह सेखों परमवीर चक्र प्राप्त यांच्या 1971 च्या भारत – पाकिस्तान च्या युद्धात झालेल्या बलिदानाला श्रद्धांजली यासोबतच भारतीय युवकांमध्ये फिटनेस, शिस्त, देशभक्ती आणि शारीरिक क्षमता वाढविण्याच्या हेतुने घेण्यात येणाऱ्या 04 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातून भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

विवेक रेहपाडे यांचे मूळ गाव वरठी नजीक असलेल्या बोथली असून प्राथमिक शिक्षण गावात झाले आहे. सुदामा कनिष्ठ महाविद्यालयातून 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मोहाडी येथे एन. जे. पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. बालपणापासून खेळाची आवड असणारे विवेक सुखदेव रेहपाडे यांनी विविध खेळामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या विभागात कार्यरत असणारे विवेक रेहपाडे हे दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या मॅराथॉन मध्ये प्रतिनिधित्व करणे जिल्ह्याकरिता गौरवाची बाब असल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे.

त्यांच्या या सहभागाबद्दल माजी आमदार चरण वाघमारे, प्राचार्य सुरेंद्र पवार, प्राध्यापिका विजया राऊत, मित्र विजय भुरे, गोपाल गायधने, विजय राऊत, विजय साकुरे, प्रा. गिरीश पंचभाई, हेमंत गाढवे यांनी अभिनंदन केले

Popular Articles