– संशयास्पद कोळशाने भरलेला ट्रक जप्त; ४१.४९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात.
कन्हान :- अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असुन अवैध व्यवसायांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.४) सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शंशाक गौडा यांचा मार्गदर्शनात कन्हान पो लीस पथक परिसरात पेट्रोलिंग करित असताना मौजा बोरडा गाव परिसरातील चैतन्य राईस मिल समोरील रोडवर एक संशयित मोठा ट्रक आढळुन आला. पोलि सांनी ट्रक क्रमांक एमपी-०९-एचजे-५७५० ला थांबवु न तपासणी केली असता त्यामध्ये दगडी कोळसा भर लेला आढळला. ट्रक चालक कमल शिवराम उजले वय ४२ वर्ष रा. हुक्का बंगला जवळ आहिरखेडी,कुंदन नगर, थाना राजेंद्र नगर, जि. इंदौर, मध्य प्रदेश यांची चौकसी करून कोळशाबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच वाहतुकीचा पास-परवाना मागितला असता संबंधित कागदपत्रे सादर न केल्याने पोलिसांच्या चौक शीत सदर कोळसा संजय छोटेलाल कश्यप रा. गोंडे गाव, कन्हान यांच्या मालकीचा असल्याचे चालकाने सांगण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोळ शाचे वजन २९,८९० किलो असल्याचे वजन काट्या वर निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या दगडी कोळशाची किंमत १,४९,४५० रुपये, तर टाटा १४ चक्का ट्रकची किंमत ४० लाख रुपये असा एकुण ४१,४९,४५० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी संजय छोटेलाल कश्यप व ट्रकचालक कमल शिवराम उजले यांच्याविरुद्ध कोळ शाची चोरी करून अवैध वाहतुक केल्याच्या आरोपा वरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(४) अन्वये कायदेशीर कारवाई करित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा इशारा
कन्हान परिसरात अवैध कोळसा चोरी करून वाहतुक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसां ची करडी नजर असुन अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडुन स्पष्ट करण्यात आले आहे. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभा गीय पोलीस अधिकारी शशांक गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कायद्याचे उल्लंघन करून अवैध व्यवसाय करणाऱ्यां विरोधात पोलिसांचा दंडा आता आणखी कडक होण्या ची चिन्हे आहेत. या कारवाईमुळे “अवैध धंदे करा आणि मोकाट फिरा” या प्रवृत्तीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असुन कन्हान पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडुन स्वागत करून कौतुक होत आहे.
सदरची कारवाई सहायक पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शंशाक गौडा, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सपोनी प्रशांत पाटणकर, पोहवा हरिष सोनभद्रे,अमित यादव, पोशि आकाश खोब्रागडे, पवन भेंडारकर, जीवन विघे, चापोशि वैजनाथ तोटवाड सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .








